जामनेर : प्रतिनिधी
जामनेर – भुसावळ रोड वरील पीर बाबा दर्ग्याजवळ महुखेडा फाट्याच्या पुढे अज्ञात तवेरा वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दोन जण गंभीररीत्या जखमी झाल्याने पुढील उपचारासाठी जळगांव येथे हलविण्यात आले आहे.
सविस्तर व्रत्त असे की तालुक्यातील पहुर येथील रहिवासी शेख शाहरूख शेख फरीद, पत्नी जमीन बी शेख शाहरूख, दिर शेख आसीफ शेख फरीद हे कुटुंब पहुर येथुन एम. एच. १९.जी २३७५ या दुचाकीवरून भुसावळ येथे नातेवाईकांच्या मरणावर सांत्वनासाठी जात असताना भुसावळ कडून भरघाव वेगाने जामनेर शहराच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात तवेरा कंपनीच्या वाहनाने जोरदार धडक दिली. हि घटना सुमारे १:३० वाजेच्या दरम्यान घडली.
तवेरा गाडीने जोरदार धडक देऊन घटना स्थळावरुन फरार झाली आहे. सोबत मागुन येणाऱ्या अपघात ग्रस्तांच्या नातेवाईकांनी जखमींना उचलुन रस्त्याच्या कडेला नेले. ताबडतोब रुग्णवाहिकेस संपर्क साधला. लागलीच रुग्णवाहिका घटना स्थळी दाखल होऊन जखमींना तातडीने उपचारासाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शेख शाहरूख यांना तोंडाला, कानाला कंबरेला व शेख आसीफ यांना उजव्या पायाला दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तसेच जमीन बी. शे. शाहरुख यांच्या तळपायाला व कंबराला मुक्कामार लागल्याने जळगांव येथे हलविण्यात आले आहे. जमीन. बी. शेख शाहरूख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तवेरा वाहना विरुद्ध जामनेर पो. स्टे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसां कडून तवेरा वाहनाचा शोध घेतला जात आहे.