भडगाव : महेश भिला पाटील
चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी येथे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मोठी यात्रा भरते. तसेच भव्य उत्सव साजरा केला जातो त्यासाठी तालुक्यातील ग्रामीण व शहरी तसेच लांबून भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात.
मातेच्या मंदिराकडे जाणाऱ्या मार्गवरुन डोंगरी नदीचा प्रवाह वाहतो,नदीवर पुल नसल्यामुळे भाविकांचे प्रचंड हाल होत असतात यासाठी ग्रामस्त तसेच इतर गावांच्या भाविकानडून अनेक महिन्यान पासून नदीवर पुलाची मागणी होत होती नदीवर पुल झाला नाहीतर आम्ही जलसमाधी घेऊ असे ११ तारखेला बुधवारी अनेक ग्रामस्थांनी नदीपात्रात उतरुण आंदोलन केले, परंतु छत्रपति संभाजीनगर येथील पुरातत्व विभागाच्या सर्वजनिक बांधकाम विभागाच्या आश्वासनाने जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आले.
याप्रसंगी बुधवारी सकाळी पाटणा गावाचे सरपंच नितीन पाटील, दीपक पाटील,दीपक गुंजाल,माजी सरपंच विलास सोनवणे, बाबा शेळके, दादा इनामदार,संजू साळुंखे, भाईदास राठोड, श्रावन राठोड, गोटीराम गिरे, यांच्यासह चितेगांव, वालझरी, गणेशपुर, येथील अनेक ग्रामस्थ नदीपात्रात जलसमाधी साठी उतरले होते.