जळगाव मिरर | १२ फेब्रुवारी २०२४
जळगाव शहरातील एका परिसरातील २३ वर्षीय गृहिणी बाजारात आली असता दोघांनी नशेत असतांना तिचा हात पकडून तुला तोंड दाखवायच्या लाईकीची ठेवणार नाही म्हणत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना जळगावातील मुख्य चौकात घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकाला दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत २३ वर्षीय गृहिणी वास्तव्यास असून दि.८ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास गृहिणी फुले मार्केट परिसरात बाजार येत असतांना दोन इसमांनी तिचा पाठलाग करीत दुपारी ४ वाजेच्या सुमारास महिलेला शहरातील मुख्य चौकात दारूच्या नशेत असलेल्या दोघांनी महिलेचा हात पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य तर तुला तोंड दाखवायच्या लाईकीची ठेवणार नाही एवढे बदनाम करून सोडेल अशी धमकी देखील यावेळी दिली. महिलेने एमआयडीसी पोलिसात धाव घेत दोन संशयीत आरोपी विरोधात विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सफौ.विजय पाटील हे करीत आहेत.