जळगाव मिरर | ४ मार्च २०२४
महिलेसोबत ओळख निर्माण करून तिच्याशी जवळीक साधत महिलेचा व्हिडिओ तयार करून तिला हॉटेलमध्ये घेऊन जात तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दि. २ रोजी उघडकीस आली. पीडित महिलेने कागदावर स्वाक्षरीसह दागिने देण्यास नकार दिल्याने महिलेला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच संशयित भूषण पाटील (रा. खेडी, ता. जळगाव) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेची संशयित भूषण पाटील याच्यासोबत ओळख निर्माण झाली. दरम्यान, भूषण पाटील याने महिलेशी जवळीक साधून तिच्यावर शहरातील दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला, तसेच अत्याचाराचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडून सुमारे तीन ते चार लाखांचे दागिने घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.