जळगाव मिरर | १७ फेब्रुवारी २०२४
एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूल येथे उपक्रम सूर्य तेजाची शक्ती आणि ऊर्जा घेऊन चैतन्याने विविध आव्हानांना लिलया पेलता येण्याचा संकल्प म्हणून जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त ११००० हजार सूर्यनमस्कार विद्यार्थ्यांनी एकत्र येत घातले सूर्यनमस्कार घालून सूर्यकिरणांना अभिवादन करण्याचा उपक्रम एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राबवला.
या प्रेरणादायी शालेय उपक्रमाला एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा भाग्यलक्ष्मी बाविस्कर, चेअरमन डॉ.धिरज बाविस्कर, संचालिका मानसी बाविस्कर,मानव संसाधन अधिकारी प्रवीण देशमुख,प्राचार्य सुभाष पटले,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निवेदिता दुबे,क्रीडा विभाग प्रमुख मयूर बोरसे शिक्षक वृंद याप्रसंगी उपस्थित होते.
८०० विद्यार्थ्यांनी शालेय मैदानावर सूर्यनमस्कार घालून पृथ्वीवर येणाऱ्या सूर्यकिरणांना प्रणाम केले. शाळेचे प्राचार्य सुभाष पटले यांनी संयम व जिद्दीने सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा जागतिक सूर्य नमस्कार दिवस निरंतरपणे करत आहोत. सूर्यनमस्कार विद्यार्थी जीवनाचा अभिन्न भाग व्हावा म्हणून प्रेरणा देणारा हा उपक्रम असल्याचे प्रास्ताविकेतून सांगितले.
मयुर बोरसे यांनी भारतीय योग विद्येला जगाने स्वीकारले आहे. शारीरिक मानसिक विकास,चित्त एकाग्रता,विविध ग्रंथी सक्रिय होण्यासाठी सूर्यनमस्कार आवश्यक आहे. हा स्तुत्य उपक्रम एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूलने राबवून प्रेरणादायी कार्य निरंतर सुरू ठेवल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.मैदान व सूर्यस्तंभ आरेखन,क्रीडा विभाग प्रमुख मयूर बोरसे,प्रशांत अहिरे,चंद्रशेखर गुरव,हेमंत चौधरी,सजावट शुभांगी पाटिल यांनी केले.संगीत संयोजन,संस्कृत सूर्य श्लोक अमीषा यादव यांनी गायले. सूत्रसंचालन अमीषा यादव तर आभार प्रदर्शन प्रशांत अहिरे यांनी केले