अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर शहरातील रहिवासी तथा जळगाव जिल्हा परिषदेचा कर्मचाऱ्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचो घटना दि ६ रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास चोपडा रेल्वे गेटजवळ (गोशाळा) येथे घडली. यात नितीन अरविंद पाटील(बोरसे, वय ५०) असे मयत झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा परिषदेत नितीन अरविंद पाटील(बोरसे, वय ५०) कार्यरत होते. ते जळगाव शहरात परिवारासोबत वास्तव्यास असून आई अमळनेर येथे समर्थनगर येथे राहण्यासाठी होती. दि.६ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास चोपडा रेल्वे गेटजवळ (गोशाळा) याठिकाणी रेल्वेखाली झोकून दिल्यानंतर गार्डच्या लक्षात आल्याने त्याने जवळ जाऊन पाहिले असता त्याच्या खिशात असलेल्या ओळखपत्रावरून त्याची ओळख पटली.अमळनेर ग्रामिण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन होऊन अमळनेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली वावरत असल्यामुळेच त्याने हे पाऊल उचलले असावे अशी चर्चा सर्वत्र होती. याबाबत अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. त्याच्या पश्चात पत्नी, आई, मुले असा परिवार आहे.