जळगाव मिरर | ४ डिसेंबर २०२३
जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या दुचाकीला समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुरलीधर वासुदेव पराते (वय ६०, रा. माऊलीनगर) यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील दूरदर्शन टॉवर परिसराजवळील माऊली नगरात मुरलीधर पराते हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. शुक्रवारी ते मुलगा विजय सोबत (एमएच १९ सीक्यू ५५४५) क्रमांकाच्या दुचाकीने भुसावळकडे जाण्यासाठी निघाले. दरम्यान, भुसावळकडून जळगावकडे (एमएच १९ सीवाय २३६६) क्रमांकाचे मालवाहू वाहन भरधाव वेगाने येत होते. या वाहनाने बाप लेकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात मुरलीधर पराते यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा विजय पराते हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी विजय यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून धडक देणाऱ्या मालवाहू चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार विजय पाटील करीत आहेत