जळगाव मिरर | २० डिसेंबर २०२३
भुसावळ तालुक्यातील महामार्गावर कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या कार चालकाने हायवेवर उभ्या असलेल्या बल्कर वाहनाला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात जखमी झाले आहेत. तीन जण गंभीर जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथे कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्नात झालेल्या बल्कर व कारच्या धडकेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज दुपारी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पूजा कॉम्प्लेक्स जवळ घडला. हायवेवर अचानक कुत्रा आला. त्याला चुकवण्यासाठी चालकाने प्रयत्न केला असता, त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ही कार हायवेवर उभ्या असलेल्या राखेच्या बल्करवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात कारचा पुढील भाग चक्काचूर झाला असून चालकासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातामुळे मोठा आवाज झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, दीपनगर औष्णिक वीज केंद्रातून बाहेर पडणारे राखेचे बल्कर हे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करत हायवेवर उभे असतात. यामुळे अनेकदा अपघात होत असून ही काहिच कारवाई केली जात नाही. तर परिवहन विभागाने अवैधरित्या उभ्या असलेल्या राखेच्या बल्करवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. या परिसरातील ही जवळपास पाचवी घटना असून यात काही जण जखमी जर काही जण मृत्युमुखी पडले आहेत.