जळगाव मिरर | २३ डिसेंबर २०२३
जगभरातील अनेक लहान मुलांना मोबाईलवरील सोशल मिडियाचे वेड लागले आहे. लहान मुल दिवसभरात तासनतास मोबाईलवर आपला वेळ घालवीत आहेत. अशावेळी पालकांनी मुलांकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. कारण मोबाईलच्या अतिवापराने मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम तर होतोच, त्याचबरोबर अनेक दुर्घटनाही घडतात. उत्तर प्रदेशच्या हनिपूर जिल्ह्यातून असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पाचवीत शिकणाऱ्या मुलाने मोबाईलवर पाहून आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हमीरपूर जिल्ह्यातील भरुआ सुमेरपूर कोतवाली भागात पाचवीत शिकणाऱ्या मुलाने मोबाईलवर मरण्याची सोपी पद्धत शोधून आपले आयुष्य संपवले. निखिल उर्फ रज्जू (वय११) असे या मुलाचे नाव आहे. निखील हा शहरातील एका सार्वजनिक शाळेत पाचवीत शिकत होता. गुरुवारी दुपारी 2 वाजता शाळेतून परतल्यानंतर तो घरात खोलीत सोफ्यावर बसून मोबाईल पाहत होता. यावेळी त्याने युट्यूबवर मिठापासून विष बनवणे, मरण्याची सोप्पी पद्धत अशा प्रकारचे व्हिडिओ पाहिले. हे व्हिडिओ पाहून निखीलने घरातील खुंटीला फास लावून तपासण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकार पाहताच निखिलच्या कुटुंबियांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
दरम्यान, निखिल हा शाळेत, अभ्यासात हुशार विद्यार्थी होता. त्याला परिक्षेत चांगले मार्क्स मिळायचे असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या चिमुकल्या जिवाने अशा प्रकारचा मार्ग का स्विकारला असावा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. निखीलच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.