जळगाव मिरर | १३ फेब्रुवारी २०२४
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारी घटना नियमित घडत असतांना चाळीसगाव शहरात देखील एका माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांचा त्यांच्या कार्यालयात बसलेले असतांना कारमध्ये येवून गोळीबार केल्यानंतर त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र दुर्देवाने उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्या संपर्क कार्यालयातील संजय बैसाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उद्देश उर्फ गुड्डू शिंदे, सॅम चव्हाण, सचिन गायकवाड,अनिस शेख उर्फ नवा शरीफ शेख, भूपेश सोनवणे, सुमित भोसले, संतोष निकुंभ उर्फ संता पेहलवान या आरोपी विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सात आरोपी पैकी अनिस शेख उर्फ नवा शरीफ शेख व सचिन गायकवाड या दोन आरोपींना चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.