• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

योजनेच्या लाभार्थ्यांना मानधन वितरित करा ; प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंच्या इशारा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 20, 2024
in राजकीय
0
योजनेच्या लाभार्थ्यांना मानधन वितरित करा ; प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंच्या इशारा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० फेब्रुवारी २०२४

संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनां अंतर्गत समाजातील अंध, अपंग, विधवा, परितक्ता, निराधार व्यक्तींना चरितार्थ चालवण्यासाठी आधार म्हणून शासनातर्फे दरमहा मानधन (वेतन) दिले जाते.

परंतु गेले पाच महिन्यां पासुन या योजनांच्या लाभार्थ्यांना मानधन मिळाले नसल्याने त्यांच्यासमोर चरितार्थ कसा चालवावा असा प्रश्न निर्माण झाला असुन त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. हि कैफियत लाभार्थ्यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्याकडे मांडली त्यावर प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि या योजनांच्या लाभार्थ्यांना सोबत घेऊन मुक्ताईनगर तहसील कार्यालय गाठून प्रशासनाला याबाबत जाब विचारला व लवकरात लवकर लाभार्थ्यांना मानधन (वेतन )वितरित करावे अन्यथा आगामी काळात पक्षा तर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे म्हणाल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना मार्फत वृद्ध निराधार अपंग विधवा परितक्ता यांना उदरनिर्वाह करण्यासाठी दरमहा शासना तर्फे मानधन (वेतन)दिले जाते. परंतु गेले पाच महिन्या पासून या योजनेच्या लाभार्थ्यांना हे वेतन मिळाले नसल्याने त्यांना उदरनिर्वाह कसा करायचा, वृद्धांनी औषधपाणी दवाखान्याच्या खर्च कसा भागवायचा असा प्रश्न उभा ठाकला असून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.
राज्य केंद्र शासन एकीकडे कोट्यवधी रुपये जाहिरातींवर खर्च करून विविध योजनांचा गाजावाजा करत आहे परंतु यातील अर्ध्या योजना फक्त कागदावर असुन त्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नाही.

संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनांचे लाभार्थी गरीब, गरजु असून सुद्धा शासन त्यांचे मानधन, वेतन देण्यास पाच पाच महिने विलंब करते आहे यातून जाहिरात बाज सरकारचे अपयश दिसून येते.

सरकारने लवकरात लवकर या योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांचे मानधन(वेतन )त्यांच्या खात्यात जमा करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रोहिणी खडसे यांनी केली अन्यथा पक्षा तर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. यावर नायब तहसीलदार माकोडे यांनी आठवडा भरात या योजनांच्या लाभार्थ्यांच्या खात्यात त्यांचे मानधन (वेतन) जमा करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी माजी सभापती निवृत्ती पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र माळी, युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे, हरिष ससाणे, प्रविण कांडेलकर, बाळा भालशंकर, सुनिल पाटील, अतुल पाटील, विकास पाटील, रउफ खान, विनोद काटे, संजय कपले, संदीप जावळे, हाशम शाह, अय्याज पटेल आसिफ पेंटर, जुबेर अली, प्रभाकर झोपे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: #jalgaon#rohinitaikhadse

Related Posts

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !
राजकीय

बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !

June 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

July 13, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

‘ऑपरेशन यात्री-सुरक्षा’ला यश; महिला प्रवाशाची पर्स चोरणारा चोर आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

रिक्षाचालकाने उचलले टोकाचे पाऊल; भुसावळात खळबळ !

July 13, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

‘पैसे का नाही दिले?’ म्हणत तरुणावर चाकूने सपासप वार

July 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group