जळगाव मिरर | ६ मार्च २०२४
देशात अनेक घटना मज्जाक मस्तीमध्ये खरो खर घडत असल्याचे अनेकदा समोर येत असते अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला घाबरवण्याच्या नादात एका तरुणाला आपला जीव गमवाल्याची घटना उत्तर प्रदेशमधून समोर आली आहे. दारुच्या नशेत पत्नील घाबरवण्यासाठी व्हिडिओ कॉलवर गळफास घेण्याचं नाटक एका तरुणाला चांगलेच महागात पडले. या भयानक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पैलानी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खपटीहा काला गावात सोमवारी रात्री (4, मार्च) घडली. गावातील रहिवासी राम किशोर वर्मा यांचा मुलगा अनिल (32) हा गेल्या तीन-चार वर्षांपासून हरियाणातील एका खासगी कंपनीत कामाला होता. तो काही दिवस त्याच्या गावात होता.
सोमवारी रात्री दहाच्या सुमारास त्याने पत्नीला व्हिडिओ कॉलिंगद्वारे गळ्यात दोरी बांधून फाशी देण्याची धमकी दिली. पती दारूच्या नशेत असल्याचे जाणून पत्नीनेही पतीला समजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पती वारंवार दोरीचा फास घट्ट बांधण्याचे नाटक करत होता. त्यानंतर अचानक दोरीचा फास त्याच्या गळ्याभोवती घट्ट बसला आणि काही क्षणातच तो लटकला, या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.