राज्यात काल उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाचे विसर्जन करण्यात आले. गणरायाच्या विसर्जन सुरु असतांना एक धक्कादायक घटना घडली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचत असताना ह्दयविकाराच्या धक्क्याने एका तरुणाचा मृत्युची घटना पुण्यातील वाघोली परिसरात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील वाघोली येथील आयव्ही इस्टेट येथे गुरुवारी रात्री सात वाजता ही घटना घडली. गणेश बाळकृष्ण दळवी (वय ४४, रा. उमंग होम प्राईमो सोसायटी, आयव्ही इस्टेट, वाघोली) असे या तरुणाचे नाव आहे. उमंग होम प्राईम सोसायटीच्या गणपती मंडळाची गणेश विसर्जन मिरवणुक गुरुवारी सायंकाळी सुरु होती. बँजोच्या तालावर गणेश दळवी हे नाचत होते. या दरमयान दळवी अचानक खाली कोसळले. त्यांच्या सहकार्यांनी त्यांना वाघोली येथील रुग्णालयात तातडीने नेले. परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता. त्यांच्या मागे आई, वडिल, पत्नी व दोन मुले आहेत.