जळगाव मिरर | २९ जुलै २०२४
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना दोन दिवसापूर्वी नवी मुंबईतील उरण रेल्वेस्थानकाजवळील झाडीत शनिवारी पहाटे २:१५ वाजता २० वर्षीय तरुणी यशश्री शिंदे हिचा छिन्नविच्छिन्न मृतदेह सापडला होता. आता यात मोठी अपडेट समोर आली आहे. हत्येपूर्वी मारेकऱ्याने यशश्रीचा प्रचंड छळ केल्याचे उत्तरीय तपासणी स्पष्ट झाले. तिच्या प्रायव्हेट पार्टवर अनेक जखमा आढळल्या. स्तन कापले, चेहरा दगडाने ठेचून विद्रूप केला. पाच वर्षांपूर्वी यशश्रीच्या कुटुंबीयाच्या तक्रारीवरून पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याने दाऊद शेख यानेच तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा खून करत बदला घेतला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. तर हा लव्ह जिहाद असण्याची शंका यशश्रीचे वडील सुरेश शिंदे यांनी व्यक्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये यशश्री शिंदे व तिच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून दाऊद शेखविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा यशश्री अल्पवयीन (१४ ते १५ वर्षे) होती. या गुन्ह्यात दाऊद शेख बराच काळ तुरुंगात राहिला होता, हे येथे उल्लेखनीय. यशश्री शिंदे ही बेलापूरमध्ये काम करत होती. शुक्रवारी तिने अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली होती. त्याच दिवशी दुपारी ३:३० ते ४ च्या दरम्यान तिचा खून झाला असावा, असे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेचे कलम १०३ अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत. गुन्हे शाखा देखील स्वतंत्रपणे या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती पानसरे यांनी दिली.
यशश्री शिंदे हिचा शोध सुरू असताना ती दाऊदसोबत असावी अशी पोलिसांना शंका होती. मात्र पोलिस तिच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच तिची हत्या झाली होती. तिची ओळख पटू नये म्हणून मृतदेह अत्यंत विद्रूप करण्यात आला. मृतदेहाची अवस्था पाहून कोणाचाही आत्मा हादरावा अशी स्थिती होती. तिच्या प्रायव्हेट पार्टवर अनेक हल्ले केल्याचे दिसून आले. तिचे हातपायही मोडले होते. पाठ आणि पोटावर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले. छातीवर शस्त्राच्या अनेक खुणा होत्या. चेहरा दगडाने ठेचला होता. त्यामुळे आेळख पटवणे अवघड झाले हाेते.
फाटलेले कपडे व प्रायव्हेट पार्टवरील जखमांमुळे यशश्रीवर बलात्कार झाला असावा असा पोलिसांना संशय आहे. मात्र याला दुजोरा मिळालेला नाही. शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. तिचे कपडेही फॉरेन्सिक विभागाकडे तपासणीसाठी दिले आहेत. फॉरेन्सिक विभागाच्या अहवालात यशश्रीवर बलात्कार झाल्याचे सिद्ध झाल्यास गुन्ह्यात बलात्काराचे कलम वाढवले जाईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
२५ जुलै रोजी यशश्री बेपत्ता झाली. तेव्हा तिचे कॉल रेकॉर्ड तपासले असता धक्कादायक बाब समोर आली. एका नंबरवर यशश्रीचे दीर्घ संभाषण व्हायचे. ती तासन््तास बोलत होती. पोलिसांनी या नंबरचा तपशील तपासला असता तो दाऊद शेख नावाच्या व्यक्तीचा निघाला. पोलिसांनी या दाऊदची पार्श्वभूमी तपासली असता हा तोच दाऊद निघाला, ज्याच्याविरोधात यशश्री व तिच्या कुटुंबाने पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला होता. पाच वर्षांपूर्वी दाऊद यशश्रीवर एकतर्फी प्रेम करत होता. यामुळेच त्याच्याविरोधात तक्रार दिली गेली. पण नंतर कारागृहातून परतल्यानंतर यशश्री आणि दाऊदमध्ये प्रेमसंबंध जुळले असावेत असा पोलिसांचा निष्कर्ष आहे. यशश्री बेपत्ता झाल्याच्या दिवशी दाऊदचा फोन बंद होता.