जळगाव मिरर | १६ डिसेंबर २०२३
देशातील अनेक राज्यातून अल्पवयीन मुलांना पळवून नेल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशीच एक थरारक घटना झारखंडमध्ये घडली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास जमशेदपूरच्या टाटानगर स्टेशनजवळ एका ८ महिन्यांच्या मुलीला पळवून नेल्याची घटना घडल्यानंतर आईवडिलांनी बागबेडा पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जमशेदपूरच्या टाटानगर स्टेशनजवळ लहान मुलीची आई ही भीक मागायची. भीक मागून ती तिचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करायची. गुरुवारी रात्री ती स्टेशनवर झोपली. त्यानंतर तिला जाग आली तेव्हा मुलगी गायब होती. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने त्या व्यक्तीचा शोध घेत आहे. वर्षभरापूर्वीही एका महिलेचे लहान बाळ एका व्यक्तीने चोरले होते. त्यानंतर पुन्हा अशीच घटना घडली आहे.
मुलीच्या वडिलांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. आम्ही रात्री इथे झोपलो होतो. अचानक माझ्या पत्नीने मुलीला घेऊन जाताना पाहिले आणि आरडाओरडा सुरू केली. आम्हाला जाग आली तेव्हा एक माणूस बाळाला घेऊन कारच्या दिशेने धावत होता. कार आधीच सुरू केली होती. तो कारमध्ये बसला आणि पळून गेला, असे त्यांनी सांगितले.
मुलीच्या आईने सांगितले की, आम्ही मुलीसोबत झोपलो होतो. रात्री १२ च्या सुमारास एक व्यक्ती आला आणि बाळाला घेऊन पळून गेला. आम्ही त्याचा पाटलाग केला पण त्याने कारमध्ये बसून पळ काढला. त्यानंतर आम्ही पोलिसांत धाव घेतली. परंतु पोलिसांनी आमची तक्रार दाखल करुन घेतली नाही.