जळगाव मिरर | २८ डिसेंबर २०२३
भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील वैदुवाड्यात व सांवतर निंभोरा येथे घराच्या आडोश्याला दोन व्यक्ती जुगाराचा खेळ खेळवत आहे, अशी गुप्त माहिती वरणगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत चौधरी यांना मिळताच पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.
मिळालेल्या म्ह्हीतीनुसार, वरणगावच्या शिवाजी नगरमधील संशयीत राजेंद्र मधुकर सैतवाल (वय ५१), व सावतर निंभोरा येथील सुनील तुकाराम कोळी (वय ४६) दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे जुगाराची साहित्य साधने व रोख रक्कम मिळाली. या पथकातील पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी, पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील, पोहेकॉ नागेंद्र तायडे, पोहेकॉ मनोहर पाटील, पोहेकॉ ईश्वर तायडे, पोहेकॉ पराग दुसाणे आदींनी वैदुवाड्यात व सांवतर निभोरा गावी जाऊन जुगार खेळणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी या प्रकरणी पोहेकॉ पराग दुसाणे यांच्या फिर्यादीवरून दोघांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली.