जळगाव मिरर | १४ डिसेंबर २०२३
भुसावळ शहरातील एका परिसरात शुल्लक कारणाने पती व मुलाला मारहाण करीत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असून याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील शारदा नगरात ४३ वर्षीय विवाहिता आपल्या पती आणि मुलासह वास्तव्याला असून दि.१३ डिसेंबर बुधवार रोजी सकाळी ७ वाजता गाडी पार्कींग लावण्याच्या शुल्लक कारणावरून याच परिसरातील राहणारे भरत बेंडाळे आणि विशाल बेंडाळे यांनी विवाहितेचा पती आणि त्यांच्या मुलाला शिवीगाळ करीत मारहाण तर महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत त्यांचा विनयभंग केला. या घटनेनंतर महिलेसह परिवाराने लागलीच भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रारीवरून संशयित आरोपी भरत बेंडाळे आणि विशाल बेंडाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहम्मद अली सैय्यद हे करीत आहे.