जळगाव मिरर | ६ मार्च २०२४
सुरत ते अमरावती जाणाऱ्या लक्झरीने भरधाव वेगात डिव्हायडरला धडक दिल्याने १५ प्रवासी जखमी झाल्याची घटना मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास भुसावळ महामार्गावरील मुन्ना तेली पेट्रोल पंपाजवळ घडली. मात्र, या प्रकरणी कोणत्याच प्रकारची नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरत ते अमरावती ही गुरुकृपा (चितांमणी) नाव असलेली लक्झरी (जीजे- ०५, बीटी-५४००) ही चालक भुसावळ येथून अमरावतीकडे भरधाव वेगात नेत होता. ही लक्झरी डिव्हायडरला धडकली. यात अकोला, अमरावती येथे जाणारे १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. अपघातस्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. या वेळी प्रवाशांनी चालक मद्याच्या नशेत गाडी चालवत असल्याचे सांगितले. यात चालक किरकोळ जखमी झाला असून लक्झरीचे नुकसान झाले आहे.