जळगाव मिरर | १७ जुलै २०२४
राज्यातील अनेक जिल्ह्यातील गुन्हेगारी दिवेसेंदिवस वाढत असतांना नुकतेच पुण्यात देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पुणे शहरातील येरवडा जेलमध्ये पुर्ववैमनस्यातून एका आरोपीची हत्या करण्यात आलेली आहे. हा आरोपी सराईत गुंड असल्याचे सांगण्यात येत आहे. जेलमधील तिघांनी त्याची एका धारधार हत्याराने हत्या केली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी प्रवीण रामचंद्र आचार्य, स्वप्निल प्रवीण आचार्य आणि किरण रामचंद्र आचार्य यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर गवसचे आरोपी कुटुंबासोबत पुर्वीपासून वाद होते. गवस याच्यावर मारहाणीसह अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे देखील दाखल होते. काही दिवसांपूर्वीच तो जेलमधून बाहेर आला होता. मंगळवारी जुन्या वादातून त्यांचे भांडण झाले. आचार्य कुटुंबीयांनी हत्यारासह त्याचा पाठलाग केला. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास सुधीर हा एका दुकानाच्या मागे लपून बसलेला होता. त्याला तिथे गाठून तिघांनी त्याच्या डोक्यात आणि शरीरावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात सुधीरचा जागीच मृत्यू झाला.