जळगाव मिरर | १४ फेब्रुवारी २०२४
एका तरुणाचे लग्न होते. लग्नानंतर वधू सासरी आली. त्यानंतर वराने मधुचंद्र साजरा करण्याची तयारी सुरू केली. यावेळी वराने उत्तेजक गोळ्या खाल्या. मात्र यात त्याने नवविवाहितेला जखमी केले. हि घटना उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये घडली आहे. दुसऱ्याच दिवशी तिची प्रकृती बिघडली. वधूला उलट्या होऊ लागल्या. वधूने याबाबत पालकांना सांगितले.
त्यानंतर पीडितेला उपचारासाठी कानपूर येथे नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यामुळे शवविच्छेदनानंतर मृतदेह घरी पोहोचल्यावर एकच गोंधळ उडाला. सासरच्यांविरोधात तक्रार करणार असल्याचे तिच्या भावाने म्हटले आहे. वधूच्या वहिनीने सांगितले की, तिच्या नणंदेने प्रकृतीबाबत फोनवरून माहिती दिली होती. प्रकृती बिघडल्याने मुलीला स्त्रीरोग तज्ज्ञांना दाखवण्यात आले. तपासणीनंतर स्त्रीरोग तज्ज्ञाने सांगितले की, मुलीसोबत सामूहिक बलात्कार केल्यासारखे संबंध ठेवले. यामुळे मुलीला अंतर्गत जखमा झाल्या होत्या. त्यामुळे संसर्ग वाढून तीचा कानपूरमध्ये मृत्यू झाला.