जळगाव मिरर | २५ नोव्हेबर २०२३
जामनेर शहरानजीक शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अनोळखी वाहनाने तीन वाहनांना कट मारीत विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात एका मुख्यध्यापकासह दोन जणांचा दुर्देवी मृत्यू तर तीन जण जखमी असल्याची झाल्याची माहिती समोर येत आहे. हि घटना जामनेर- बोदवड रस्त्यावरील मालदाभाडीनजीक घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेरहून बोदवडकडे सुनील भोई आणि दत्तू माळी हे दुचाकीने निघाले होते. त्याच्यामागे ईश्वर पारधी हेही दुचाकीने मालदाभाडीकडे निघाले होते. मालदाभाडीनजीक समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने या दोन्ही दुचाकी आणि त्यांच्यामागे असलेल्या चारचाकी वाहनाला कट मारला. यामुळे दुचाकी बाजूला फेकल्या गेल्या आणि त्या एकमेकांवर आदळल्या. यात वरील तीनही जण जागीच ठार झाले. या भीषण घटनेनंतर अपघातातील एका दुचाकीने पेट घेतला. त्यात दुचाकी जळून खाक झाली.
याचवेळी चारचाकी वाहनावरील चालकाचेदेखील नियंत्रण सुटल्याने तीही रस्त्याच्या बाजूला जाऊन कोसळली. यात चारचाकीतील तीन जण जखमी झाले आहेत. ते पुण्याहून घाणखेडकडे (ता. बोदवड) निघाले होते. अपघाताची माहिती मिळताच जामनेर येथून जालमसिंग राजपूत रुग्णवाहिकेसह अपघातस्थळी पोहोचले. मालदाभाडी, नवीदाभाडी व वाडीकिल्ला येथील ग्रामस्थांनी मदतकार्य केले. तीनही मृतदेह रात्री जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. या ठिकाणी नातेवाइकांनी गर्दी केली होती. जामनेर येथील पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या भीषण अपघातात जामनेर तालुक्यातील वाडीकिल्ला जि. प. शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर त्र्यंबक पारधी (वय ४२), सुनील शांताराम भोई (४५, रा. जामनेर रोड, बोदवड) आणि दत्तू रामा माळी (३०, रा. माळी वाडा, बोदवड) यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.