जळगाव मिरर | ११ जानेवारी २०२४
भरधाव ट्रकने ट्रीपलसीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना एरंडोल शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील अमळनेर नाका चौफुलीवर बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात भैय्या धनगर (रा. धरणगाव) नामक तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी जेसीबीने महामार्ग खोदून काढला. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूने वाहतुक खोळंबली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरतवून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग सहावरील अमळनेर नाका चौफुलीवर (एमएच ४८ एटी ७६८२) क्रमांकाच्या ट्रकने (एमएच १९ बीके ०४४२) क्रमांकाच्या ट्रीपलसीटी जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याची घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये भैय्या धनगर नामक दुचाकीस्वार ठार झाला बापू साठे व अन्य एक जण गंभीर जखमी झाले. याठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी महामार्गावर जेसीबी घेवून येत त्यांनी महामार्गाच्या दोन्ही बाजू खोदून काढला. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुक विस्कळीत झाली होती.