जळगाव मिरर | १९ फेब्रुवारी २०२४
राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच पुणे शहरात देखील दिवसेदिवस गुन्हेगारी वाढत आहे. पुण्यातील खराडी परिसरात पार्किंगच्या वादातून एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी महेश राजे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश राजे व याप्रकरणी आरोपी हे एकाच परीसरात राहतात. त्या दोघांच्या मध्ये पार्किंग वरून वाद सुरू होता. १७ फेब्रुवारी रोजी त्यांच्यात वाद भडकला आणि१० ते १५ जणांच्या टोळक्याने फिर्यादी महेश राजे यांची एक चारचाकी गाडीचे फोडून नुकसान केले.तसेच त्याठिकाणी असलेली एक दुचाकीसुद्धा आरोपींनी पेटवली. याचवेळी फिर्यादी यांची भाडेकरू महिला देखील त्या ठिकाणी असल्यामुळे तिच्या अंगावर सुद्धा आरोपींनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने तेथून पळ काढल्यामुळे मोठा अनुचित प्रकार घडला नाही.
दरम्यान, याप्रकरणी महेश राजे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील काही जण रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.