जळगाव मिरर | २९ जुलै २०२४
बसमध्ये जागा मिळविण्यासाठी धावपळ करणाऱ्या विद्यार्थ्याचा पाय बसच्या मागील चाकाखाली आल्याने विद्यार्थी किरकोळ जखमी झाला. नंदुरबार बसस्थानकात शुक्रवारी सायंकाळी घडली होती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर घटना समोर आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, नंदुरबार-कंद्रे बस नंदुरबार बसस्थानकावर आल्यावर बसमध्ये जागा मिळावी यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली. यातील एका विद्यार्थ्याचा पाय बसखाली आल्याने तो किरकोळ जखमी झाला आहे. यावेळी बस थांबल्याने तो बचावला. बस सुरू राहिली असती तर अनर्थ घडला असता. डेपोमधून बस (क्रमांक एम.एच.३९-७०१) स्थानकात आली असता नंदुरबार ते केंद्रे मार्गावरील विविध ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची जागा मिळविण्यासाठी एकच झुंबड उडाली. यातील एक विद्यार्थी खाली पडल्याने त्याचा पाय चाकाखाली आला. सुदैवाने बस लागलीच थांबली होती. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.