जळगाव मिरर | १५ डिसेंबर २०२३
अनेक परिवारात नेहमीच छोटे मोठे भांडण होत असते पण काही भांडण काही वेळेपुरता मर्यादित असते तर काही मात्र शेवटचे टोक गाठत असते अशीच एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरातून समोर आली आहे. पतीचे विवाहबाह्य संबंध आणि दारू पिऊन सतत होणाऱ्या मारहाणीला कंटाळून पत्नीने स्वतःच जीवन संपवलं. सदर घटनेबाबत मृत विवाहितेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पती सतत त्रास देत असल्याचे पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. संभाजीनगर शहरात शिवशंकर कॉलनीत ही घटना घडली. १४ डिसेंबरला पहाटे साडेतीन वाजता सर्वजण गाढ झोपेत असतांना विवाहितेने हे टोकाचं पाऊल उचललं. तिच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. आपल्या मुलीचं लग्न करून दिल्यावर ती सासरी सुखाने नांदावी असं प्रत्येक आई-वडिलांना वाटतं. मात्र मुलीच्या सासरी होणारा त्रास मुलीने निमुटपणे सहन केला. तिने वडिलांकडे याबाबत जास्तवेळा तक्रार केली नाही. आपली मुलगी या जगात नाही हे समजताच तिच्या वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली.
मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी टाहो फोडला. आपल्या मुलीने सासरी होणाऱ्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर या प्रकरणी मृत विवाहितेच्या वडिलांनी पती आणि सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली आहे. दिलेल्या तक्रारीवरून पतीसह तिघांविरुद्ध जवाहरनगर ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलका पवन मुटेकर असे मृत विवाहितेचे नाव आहे.