जळगाव मिरर | १८ फेब्रुवारी २०२४
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या मालिका सुरु असतांना नुकतेच अमरावतीमध्ये मिनी बस व सिमेंट काँक्रिट मिक्सरच्या झालेल्या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. १० जण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात अमरावतीतील नांदगाव-खंडेश्वर रोडवर झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ येथे क्रिकेट मॅच खेळण्यासाठी १४ तरुण अमरावतीहून यवतमाळसाठी निघाले होते. मात्र वाटेतच नांदगाव-खंडेश्वरजवळ शिंगणापूरजवळ हा अपघात झाला. यामध्ये ४ तरुणांचा मृत्यू झाला तर १० जण गंभीर जमखी झाले आहे. अपघातातील जखमी नागरिकांना नांदगाव खंडेश्वर येथील तालुका आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर काही गंभीर जखमींना अमरावती येथे पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.