जळगाव मिरर | २४ डिसेंबर २०२३
न्यू एरा एज्युकेशन सोसायटीचे रोझलॅन्ड इंग्लिश मिडिअम हायस्कूल, जळगाव तर्फे सुवर्ण महोत्सवी वर्ष विविध उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम याद्वारे जल्लोषात साजरा करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद सीईओ अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, संस्थेच्या अध्यक्षा रोझमीन खिमाणी प्रधान यांचं हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी अमेरिकेतील सॅनरोज फाऊंडेशनच्या ‘टीम यू.एस.ए व्हाॅलेंटिअर प्रोग्राम’ अंतर्गत अमेरिका व फ्रान्स येथून तीन महिने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आलेली टीम त्यातील ओगान, लिली विंटर, अलिसा बुकमायर,शॅड ब्यूकॅनन, सानिया प्रधान व सनूर प्रधान हे सर्व याप्रसंगी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रमुख अतिथी जिल्हा परिषद CEO मा.अंकित यांनी विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन असलेल्या सादरीकरणाचे व संस्थेतर्फे राबवल्या जाणाऱ्या विधायक उपक्रमांचे कौतुक केले तसेच संस्थेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोझलॅन्ड इंग्लिश मिडिअम हायस्कूल व रोझलॅन्ड प्राथमिक विद्या मंदिर या दोन्ही विभागाच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. रोझलॅन्ड इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सिता तिवारी यांनी संस्थेला दिलेल्या योगदानाची ३० वर्ष पूर्ण झाल्याने यांचा सत्कार प्रितम सिन्हा मॅडम यांनी केला. कार्यक्रमाची सुरुवात हर्षा खडके यांनी केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका कोळी व निकी वेद मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन साधना शर्मा मॅडम व नौशबा मॅडम यांनी केले.