अमळनेर : विक्की उत्तम जाधव
३ व ४ फेब्रुवारीला कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरी अमळनेर येथे संपन्न होणारे विद्रोही मराठी साहित्य संमेलन पत्रिकेचे डिजिटल उद्घाटन संमेलन स्थळी संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले. दोन दिवस रसिक,श्रोते व प्रेक्षकांचे अनुभव विश्व समृध्द करणाऱ्या वैचारिक, साहित्यिक,सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमासह कला प्रदर्शनाचे विविध सादरीकरणाची भरगच्च रेलचेल पत्रिकेत आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत अठरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची पत्रिका पत्रिकेचे डिजिटल अनावरण मुख्य समन्वयक प्रा अशोक पवार, स्वागताध्यक्ष श्याम पाटील, मुख्य संयोजक प्रा.लिलाधर पाटील, निमंत्रक रणजित शिंदे यांनी स्थानिक अध्यक्ष गौतम मोरे, कोषाध्यक्ष बापूराव ठाकरे, वैशाली शेवाळे,अनिता संदानशिव, सारिका पाटील, योगीता पांडे, रंजना महाजन,वर्षा बाविस्कर, उज्वल मोरे,शुभम पाटील यांचे सह विद्रोही संयोजन समितीच्या महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केले.
दोन दिवस असलेल्या संमेलनाचे ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर वासुदेव मुलाटे हे संमेलनाचे अध्यक्ष असून साहित्य अकादमी पुरस्कार विजेते नामवंत उर्दू हिंदी कादंबरीकार रहमान अब्बास धामसकर हे प्रमुख पाहुणे आहेत तर ज्येष्ठ हिंदी कवी संपत सरल हे उद्घाटक असून मावळते संमेलनाध्यक्ष ‘गांधी मरत का नाही?’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक चंद्रकांत वानखेडे, लेखक गणेश विसपुते, प्रल्हाद लुलेकर, प्रतिभा अहिरे , प्रतिमा परदेशी हे प्रमुख अतिथी आहेत. यावेळी वर्धा , उदगीर ,नाशिक येथील मागील तीन विद्रोही संमेलनांचे स्वागत अध्यक्ष व संयोजक उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटनंतर दुसऱ्या सत्रात याच सत्यशोधक तत्त्वज्ञ कॉम्रेड शरद पाटील विचार मंचावर विद्रोही जीवन गौरव पुरस्कार हिराचंद बोरकुटे, विजय सुरवाडे, शिवाजीराव पाटील गांधालिकर,खलील देशमुख , बाबूला नाईक, प्राचार्य जनार्दन देवताळे, लिलाबाई वळवी, व्हीं टी जाधव, सुभाष काकुस्ते व सुभाष अहिरे या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सामाजिक साहित्यिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केलेल्या मान्यवरांना विद्रोही जीवन गौरव पुरस्काराने मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
यानंतर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे लिखित अमळनेर ते अमर हुतात्मे या पोवाड्याचे गायन शाहीर भास्कर अमृतसागर करतील. चौथे सत्र खानदेशी दिवंगत कायदे तज्ञ एडवोकेट निर्मल कुमार सूर्यवंशी स्मृती समर्पित असून यावेळी ” भूरा ‘ आत्मकथनाचे प्रसिद्ध दिल्ली स्थित लेखक डॉ. शरद बाविस्कर यांच्याशी पत्रकार लेखक सुधिर सूर्यवंशी साहित्य संवाद साधणार आहे. कोल्हापूरचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रवींद्र ठाकूर अध्यक्षस्थानी असतील.
नंतरच्या सत्रात विविध विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी व लोकशाहीसाठी लढणाऱ्या श्रावणी बुवा, एन एस वायर, सोमनाथ निर्मळ ,एस एफ आय चे जयेश पठाडे, सत्यशोधक विद्यार्थी संघटना चंदन सरोज, अमीर काझी ए आय एस एफ या लढाऊ विद्यार्थी कार्यकर्त्यांचा सत्कार केला जाणार आहे. तर संविधानिक स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या माध्यम या लोकशाहीच्या चौथ्या खांबातील पत्रकार कमलेश सुतार , रवी आंबेकर लोकशाही वृत्तवाहिनी व मॅक्स महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संजीव सोनवणे तसेच वज्रधारी कार दत्तकुमार खंडागळे यांचा लोकशाही रक्षणाच्या कामगिरीबद्दल सत्कार करण्यात येणार आहे. पुढील सत्रात ‘बोलीभाषा अभिव्यक्ती सौंदर्य आणि विद्रोह” हा अहिराणी तावडी व आदिवासी बोलींवरील महाचर्चेचा परिसंवाद असून खान्देश साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली वाल्मीक आहिरे, पाचोरा, सुनील गायकवाड चाळीसगाव, एस के पाटील मालेगाव, प्राध्यापक बन्सीलाल भामरे तळोदा, प्राचार्य रामकिशन दहिफळे संभाजीनगर, किसन वराडे मुंबई हे मान्यवर अभ्यासक यात मांडणी करणार असून अहिराणी संस्कृती अभ्यासक धुळ्याचे पत्रकार महर्षी सदाशिवराव माळी यांच्या स्मृतीस हा परिसंवाद समर्पित करण्यात आला आहे.
यानंतर जयंत पवार लिखित “दरवेशी” ही एकांकिका मुंबई स्थित कलावंत वसंत अंसरलेकर, सुरेंद्र नाईक हे सादर करतील तर अभिषेक मोरे यांचे पार्श्व संगीत असून विजय मुंडकर यांनी एकांकिकेचे दिग्दर्शन केले आहे.
दिवंगत शायर राहत इंदोरी स्मृति समर्पित परिसंवाद आठव्या सत्रात होईल. ‘अघोषित आणिबाणीच्या घेऱ्यात जीव गुदमरत असताना शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू’ प्रख्यात अभ्यासक डॉ.वंदना महाजन मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली लेखिका संध्या नरे पवार मुंबई ,प्राचार्य फारुक शेख नाशिक , प्रा मारुती कसाब उदगीर,प्रा.रेखा मेश्राम छ. संभाजी नगर , डॉ.सत्यजित साळवे जळगाव हे मान्यवर आपले विचार मांडणार आहेत.
रात्री ७.३० वा. सुरू होणाऱ्या सत्रात विद्रोही साहित्य संमेलनलनाचे दिवंगत अध्यक्ष जयंत पवार लिखित दोन कथांचे अभिवाचन छ.संभाजी मालिकेतील हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारणारे मुंबई येथिल अभिनेते अनिल गवस हे करणार आहेत .
सुप्रसिद्ध आंबेडकरवादी कवी त्र्यंबक सपकाळे यांच्या स्मृतीस अर्पित कवी संमेलन लोकनाथ यशवंत नागपूर, डॉ. मिलिंद बागुल जळगाव, डॉ. प्रतिभा अहिरे छ. संभाजीनगर व लक्ष्मी यादव मुंबई या मान्यवर कवींच्या अध्यक्षतेखाली होणार असून यशवंत मकरंद परभणी,डॉ. सतीश मस्के धुळे, समाधान इंगळे छ.संभाजीनगर हे मान्यवर सूत्रसंचालक असतील तर महाराष्ट्रातील लोककवी प्रशांत मोरे, खेमराज भोयर, गोविंद गायकी, प्रफुल्ल धामणगावकर, भरत यादव, सुभाष अहिरे, राजेंद्र कांबळे ,अंकुश सिंदगीकर, अनघा मेश्राम, इमरान शेख, तुकाराम धांडे, कांतीलाल पाडवी, प्राध्यापक गौतम निकम, व्यंकट सूर्यवंशी, नितीन चंदनशिवे आदि सुप्रसिद्ध कवी सहभागी होणार आहेत .
रविवार ४ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ७.३० ला शेकोटी पहाट काव्य संमेलनाने सुरूवात होईल.यात आमंत्रित व नवोदित कवी कविता सादर करतील. यानंतर सत्यशोधक आदिवासी कलापथक नंदुरबार हे पावरी, शिवली, काठी ढोल इत्यादी आदिवासी कला व संगीत सादर करतील
यानंतर संमेलनातील सर्वाधिक लक्षवेधी असा गट चर्चेचा कार्यक्रम सत्यशोधक कॉम्रेड शरद पाटील विचार मंचावर होणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रेक्षकांना फक्त ऐकण्यासाठी जावे लागते परंतु विद्रोही साहित्य संमेलनात मात्र प्रेक्षकांनाआपलेही मत मांडता येते. या सत्रात “साने गुरुजींचे साहित्य रडणारे नव्हे, विवेकासाठी लढणारे ” या सह जातनिहाय जनगणना,
माध्यमांची गळचेपी,आदिवासी आरक्षण, नवे कामगार कायदे, अल्पसंख्याकांचे प्रश्न, खानदेशातील शेती प्रश्न, स्त्री प्रश्न ,अहिराणी भाषा, शिक्षण विषमतेचे कारण, भारतीय संविधान घात, आदिवासी आरक्षण, तसेच रोजगार या तेरा विषयांवर गटचर्चा होईल यात संमेलनातील सर्व सहभागी आपल्या आवडत्या गट चर्चेत सहभागी होऊन विचार मांडतील त्यानंतर प्रत्येक गटातील अध्यक्ष व सूत्रसंचालक असे २६ मान्यवर अध्यक्ष विचार मंचावर सारांश मांडतील.संमेलनाचे संयोजक साथी अविनाश पाटील धुळे, डॉ. अशोक चोपडे वर्धा व आयु.मुकुंद सपकाळे जळगाव अध्यक्षता हे करतील. तुषार संदानशिव, डॉ.नवनाथ गोरे हे संयोजक असलेल्या या सत्राचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.विलास बुवा पुणे हे करतील.
यानंतरच्या सन्मान मायबोलीच्या सत्रात खान्देश व अहिराणीतील बोलीभाषांसाठी कला,साहित्य, संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रात ‘धर्म संस्कृतीचे समतावादी प्रवाह’ ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे” या विषयावर
आदि धर्म ,बौद्ध धम्म,वारकरी, महानुभाव, लिंगायत सत्यधर्म, शिवधर्म या संदर्भात आजच्या अंधकारमय परिस्थितीत माणूस मानवतेला पारखा झालेला असताना साने गुरुजींचा मानवता धर्माचा उपदेश व समतेच्या धर्मावर विषयावर चर्चा होईल. महाराष्ट्रातील विविध धर्मपिठांचे प्रमुख प्रतिनिधी, प्रा. भिमसिंग वळवी, निवृत्त आयएएस जिल्हाधिकारी बी जी वाघ, महानुभाव आचार्य प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर, लिंगायत मठाधिपती कोरणेश्वर आप्पाजी,वारकरी पंथाचे धर्मकीर्ती महाराज, सत्य धर्माचे शिवाजी राऊत, व शिवधर्माचे डॉ.अशोक राणा हे मान्यवर सहभागी होणार आहेत. सर्व सहभागी धर्म अभ्यासाकांचा सत्कार संत सखाराम महाराज संस्थान,प्रति पंढरपूरचे प्रमुख प्रसाद महाराज यांचे हस्ते करण्यात येणार आहे.
दुपारी गायिका सुनिता मोरे जिजाऊ सावित्रीचीअहिराणी ओवी व वामनदादांचे गीत सादर करतील. शाहीर ईश्वर वाघ जळगाव हे भीम गीत व क्रांती गीत सादर करती. विद्रोहीचे पूर्वाध्यक्ष व ज्येष्ठ गजलकार मुस्लिम मराठी साहित्यिक डॉ.अजिज नदाफ यांच्या सन्मानार्थ गजल संमेलनाचे सत्र आयोजित करण्यात आले असून महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गजलकार सुरेश वैराळकर पुणे हे संचालन करणार असून शरद शेजवळ नाशिक व रमेश सरकटे भुसावळ यांच्या अध्यक्षतेखाली सचिन सातारकर, कीर्ती वैराळकर, उत्तम गेंदे ,ज्ञानेश पाटील ,अज्ञातवासी, या सह लोकप्रिय गजलकार शरद धनगर, सुदाम महाजन, यांचेसह संदिप बडगुजर, सिद्धार्थ भगत, नंदू दामोदर, सुरेश शेंडे, छाया बैसाने, शुभा लोंढे, विशाल जाधव आदिंसह १९ जिल्ह्यातील गझलकार गजल रचना सादर करतील. यानंतर सुप्रसिद्ध युवा रेप गायिका जी माही चे रॅप गीतांचे सादरीकरण होईल.
बालमंच
४ फेब्रुवारी रोजी आदिवासी क्रांतिवीर ख्वाजा नाईक सभा मंडप क्रमांक २ ला ९ वाजता सत्यशोधक मुक्ता साळवे बालमंचाचे उद्घाटन गाथा परिवाराचे कथाकार प्रा. उल्हास पाटील यांचे “तुकोबा जीवन संघर्षाची कहाणी” या गोष्टीचे कथनाने करतील. गावित धुळे अध्यक्षस्थानी असतील. विद्रोही बाल
मंच संयोजक सोपान भवरे व राजेश राठोड हे सूत्रसंचालन करतील. यानंतर मुलांचे गाणी, समूहगीते, नाट्य अभिनय, वेशभूषा, प्रबोधन गीते यांचे सादरीकरण होईल. स्नेहल सिसोदे, शैलजित शिंदे, भाविका वाल्हे, अजिंक्य सोनवणे, नाजमीन पठाण हे विद्यार्थी सूत्रसंचालन करतील.मा.आयकर आयुक्त संदीप कुमार साळुंखे यांच्या संकल्पनेतून तयार झालेली डॉ.कलाम फिरती प्रयोगशाळा विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकणार आहे. तसेच पार्क फाउंडेशनचे पंकज दुसाने यांचे ऐतिहासिक शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आकर्षण राहील.
युवा मंच
शहीद भगतसिंग युवा मंचाचे उद्घाटन सभा मंडप क्रमांक दोन मध्ये दुपारी भरत यादव सोलापूर हे लोकशाहीवादी क्षितिजाच्या अनुवादित कवितांचे वाचनाने करतील. गोपाळ नेवे व पुरुषोत्तम पाटील आवारे अकोला हे प्रमुख पाहुणे असतील. बळवंत भालेराव व प्रा.यशवंत मोरे हे संयोजक तर अध्यक्ष ॲड.नाना अहिरे मुंबई हे असतील.दुपारी ‘मी सावित्रीबाई फुले बोलते’ हा एकपात्री प्रयोग प्रा. मिनाक्षी वाघमारे सादर करतील.
‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे कष्टकरी बहुजन विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षणातून हद्दपार करणारे आहे’ या विषयावर महाराष्ट्रातील विद्यार्थी नेते छात्र भारतीचे रोहित ढाले , एआयएसएफ विराज देवांग,एस एफ आयचे सोमनाथ निर्मळ, न्यू स्टुडन्ट अँड फेडरेशन निहारिका सत्यशोधक विद्यार्थी संघटना निशिकांत कांबळे व तुकाराम शिंदे, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे सुनील गव्हाणे हे आपले विचार मांडणार आहेत. प्रा.सुनील वाघमारे अंमळनेर अध्यक्षस्थानी असतील. यानंतर भारतीय स्त्रीरत्ने हा सांस्कृतिक कार्यक्रम प्राचार्य प्रतिभा नरवाडे जामनेर यांच्या अध्यक्षतेखाली वैशाली पाटील आणि संघ सादर करणार आहेत.
सभा मंडप क्रमांक दोन मध्ये आसक्त पुणे प्रस्तुत ‘मंटो की बदनाम कहानिया’ या निवडक कथांचे अभिवाचन सुयोग देशपांडे पुणे दिग्दर्शित गिरीजा पातुरकर,मुक्ता कदम, अतुल जैन या विख्यात कलावंतांकडून सादर होईल. संध्याकाळी खान्देशी लोककलांचे सादरीकरण व मेधा पाटील यांचा ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी बोलते’ हा एकपात्री प्रयोग व “बोल इंनक्लाबी” यांचे रॅप गीत सादर होणार आहे.
समारोप सत्र
रात्री ८ वाजता संभाजी ब्रिगेडचे नेते, उद्योजक प्रविण गायकवाड यांच्या हस्ते पुढील संमेलनाची ज्योत पेटवून समारोप सत्र सुरू होईल.या सत्रात हसीब नदाफ,एल जी गावित व सुदीप कांबळे हे ठराव वाचन करतील.यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळच्या राज्याध्यक्ष प्रा.प्रतिमा परदेशी या अध्यक्ष असतील.यावेळी स्वागताध्यक्ष श्याम पाटील,मुख्य संयोजक प्रा.डॉ. लिलाधर पाटील, मुख्य समन्वयक प्रा.अशोक पवार, निमंत्रक रणजित शिंदे, मुकुंद सपकाळे, डॉ.मिलिंद बागुल, लिना पवार यांचेसह विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे पदाधिकारी मंचावर राहतील. आदिवासी ढोल नृत्याने आनंददायी समारोप होईल.