जळगाव मिरर | ११ जानेवारी २०२४
संपूर्ण देशभरात सध्या श्रीराम मंदिर स्थापनेचा उत्सव साजरा केला जात आहे. अयोध्या येथे दि.२२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना उत्सव साजरा केला जाणार असल्याने जळगावातील शानिपेठ परिसरातील संकल्प महिला मंडळातर्फे घरोघर अक्षदा वितरण करण्यात आले. प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जयघोषात अक्षदा आणि माहिती पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. प्रसंगी महिलांची संख्या लक्षणीय होती.
देशभरात सध्या श्रीराम मंदिर स्थापनेचा आनंदोत्सव सुरू असून प्रत्येक गावात विविध कार्यक्रमांचे नियोजन केले जात आहे. जळगाव शहरातील शनिपेठेत असलेल्या जय श्रीराम मित्र मंडळ आणि संकल्प महिला मंडळातर्फे अयोध्या येथून आलेल्या मंत्रित अक्षदांचे परिसरात वितरण करण्यात आले. मुख्य चौकात माजी होमगार्ड समादेशक रमेश दलाल यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करून अक्षदा वाटपाला वाजत गाजत सुरुवात करण्यात आली. घरोघरी जाऊन अक्षदा आणि माहिती पुस्तिका देऊन सर्वांना दि.२२ जानेवारी रोजी होणारा श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.
शनिपेठेत दररोज आनंदोत्सव साजरा केला जाणार असून दि.२२ रोजी मुख्य चौकात सकाळपासून धार्मिक कार्यक्रम आणि भजनचे आयोजन केले जाणार आहे. परिसरातील सर्व भाविकांना अक्षदा निमंत्रण देताना उपक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले. प्रसंगी संकल्प महिला मंडळाच्या राजकुमारी उपाध्ये, छाया चौधरी, शीतल जोशी, वंदना शिंदे, दीपा पवार, हेतल पाटील, श्वेता देवरे, काजल चौधरी, नंदिनी चौधरी, पूजा चौधरी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमोद निकुंभ, पराग महाशब्दे, जय श्रीराम मित्र मंडळाचे राजेंद्र उपाध्ये, संजय शिंदे, मोहित प्रजापती, जितेंद्र माळी, हर्षल चौधरी, चेतन वाणी, मयूर चौधरी, विजय देवरे, रोहित जोशी, गौरव चौधरी, देवेंद्र चौधरी, निखील जोशी, कुणाल कांकरिया, साहिल जोशी, कार्तिक प्रजापती आदींसह मंडळाचे इतर भाविक उपस्थित होते.