जळगाव मिरर | १८ जानेवारी २०२४
जळगाव शहरात नवीन तयार करण्यात आलेला पिंप्राळा रेल्वे उड्डाण पूल महारेलकडून तीन दिवस वाहतुकीसाठी पुलाच्या डाव्या बाजूच्या कामांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
पुलाच्या डाव्या बाजूला बॉक्स कॉक्रीटचे करण्याचे काम केले जाणार असल्याने दि. १८ ते २१ जानेवारी दरम्यान हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद असणार आहे, अशी माहिती महारेलकडून देण्यात आली आहे. महिन्याभरापूर्वी जळगाव येथील भोईटे रेल्वे गेटवर नव्याने तयार झालेला पिंप्राळा उड्डाण पुलाचे उद्द्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर हा पूल जळगावकरांसाठी खुला करण्यात आला होता. या उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूच्या पिंप्राळा रस्त्यावर उतरणाऱ्या पुलाचे काम प्रगतीवर सुरू आहे. या पुलाच्या बॉक्स काँक्रिटीकरणाचे काम महारेलकडून गुरूवार दि.१८ रोजीपासून सकाळी हाती घेतले आहे. रविवार दि. २१ रोजी रात्रीपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार असून, गुरुवारी सकाळी आठ वाजेपासून ते रविवारी रात्री १० पर्यंत हा रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केला आहे.