जळगाव मिरर | २८ जानेवारी २०२४
जळगाव शहरापासूननजीक असलेल्या पिंप्राळा येथील ओम श्री साई बहूउद्देशीय संस्थेच्या मार्फत दीर्घाकाळापासून सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात अग्रेसर असते. पिंप्राळा परिसरातील लोकांना अंत्यत्रेसाठी वेळेवर स्वर्गरथ उपलब्ध होत नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत होता.
ही बाब संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या लक्ष्यात आल्यानंत्तर त्यांनी समाजातील दानशूर व्यक्तींच्या व स्वखर्चातून अतिशय कमी कालावधीत सुसज्य व सर्व सुविधा युक्त असा स्वर्गरथ दि.२८ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, पिंप्राळा येथे जळगावचे आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी उपमाहापौर डॉ. अश्विन शांताराम सोनवणे, विष्णू पाटील परिसरातील सर्व आजी-माजी नगरसेवक, नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
यावेळी स्वर्गरथ निर्मितीसाठी विलास पाटील, विलास माळी, अविनाश पाटील, सचिन जंगले,शाम बारी,किशोर पाटील व साई भक्तांनी परिश्रमाणे रथ साकार झाला. या उपक्रमांस परिसरातील सामाजिक कार्यकर्ते श्री. संदीप पितांबर पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले