जळगाव मिरर | १९ फेब्रुवारी २०२४
श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्रजी पवार महानगर जिल्हाअघ्यक्ष , संस्थेचे सचिव माननीय श्री अशोक लाडवंजारी हे होते तर प्रमुख अतिथी संस्थेचे उपाध्यक्ष बाळाजी सानप सर संस्थेचे संचालक वासुदेव सानप, गजानन लाडवंजारी, भगवान लाडवंजारी, संतोष भाऊ चाटे व संस्थेच्या संचालिका संध्याताई वंजारी या प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिवाकर जोशी सर व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ईश्वरी इखे मॅडम या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली यावेळी अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन केले तसेच अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने करण्यात आला.
या कार्यक्रमांमध्ये इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी बाल शिवाजी ,स्वराज्य शपथ विषयक नाटक, तसेच अफजल खान वध नाटक, व छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या विषयी कार्यक्रम सादर केले. यावेळी बाल शिवाजी ओम शिंदे व अफजलखान वध नाटकामध्ये शिवाजीची भूमिका करणारा ओम शिंदे याच कौतुक अध्यक्ष प्रमुख अतिथी यांनी केले तसेच या नाटकांना कार्यक्रमाचे अघ्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्रजी पवार महानगर जिल्हाअघ्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी प्रथम बशिक्ष दिले , प्रमुख अतिथी व संस्थेचे संचालक माननीय भगवान लाडवंजारी यांनी 501 रुपये बक्षीस दिले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संस्थेचे संचालक गजानन लाडवंजारी यांनी या नाटकांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 101 रुपये दिले यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख संनो पिंजारी मॅडम, यांनी केले तर आभार अतुल चाटे सर यांनी मानले. कार्यक्रम साठी श्रीराम प्राथमिक माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य व परिश्रम घेतले