चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील एका बँकेला गहान खरेदीखत देवून घर बांधकाम करायचे सांगून वेळोवेळी बँकेकडून पैसे घेत १० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात चाळीसगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तन्मयदास गोरगोपाल दास(धंदा नोकरी, रा.बँक रोड, विध्या वासानी नगर, गोरखपूर ह.मु. मिलेनियम पार्क सोसायटी चेखल्थाने, औरंगाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिता खुशाल माळी(रा.मौजे सिताणे ता. जि. धुळे) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील कॅनेरा बँकेत घर बाधण्यासाठी कर्ज मिळावे म्हणून अनिता खुशाल माळी(रा.मौजे सिताणे ता. जि. धुळे) यांनी येथील ग्रामपंचायत मा. क्रं. २१ क्षेत्र ७७x२० = १५४० चौ. फुट बखाळ जागा याठिकाणी घर बांधवयाचे आहे. असे कॅनेरा बँकला सांगुन दहा लाख रुपये पैकी बँकेकडुन एकुन ०९,६७,८४६ रुपये एवढे कर्ज घेवुन दि. २७ फेब्रुवारी २०१५ रोजी कर्जदार आरोपी यांनी बँकेला सदर मिळकत वर दस्त क्रं. १२९३/२०१५ अन्वये नोंदणीकृत रजिष्टर गहाण खत करुन देवुन तसेच वेळोवेळी घर बांधकामाचे खोटे दस्त व फोटो बँकेत सादर करुन बँकेकडुन ०९,६७,८४६/- रुपये कर्ज घेवुन आजपावेतो सदर कर्जाची रक्कम ०९,७२,५३४/- रुपये व्याज बँकेला परत न करता बँकेला करुन दिलेले गहाण खत दस्त क्रं. १२९३/२०१५ प्रमाणे सदर ठिकाणी घराचे बांधकाम न करता बँकेची फसवणुक केली आहे. पुढील तपास सपोनि सचिन कापडणीस हे करीत आहे.